Maharashtra Kesri 2022 | ४२ वर्षांपासून कुस्ती स्पर्धेत हलगी वादन करणारे माजी नगरसेवक | Sakal Media

2022-04-06 128

Maharashtra Kesri 2022 | ४२ वर्षांपासून कुस्ती स्पर्धेत हलगी वादन करणारे माजी नगरसेवक | Sakal Media

सध्या साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडीयम येथे सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी मल्लांप्रमाणेच एका अवलियानं तमाम कुस्तीप्रेमींच लक्ष वेधलं आहे. हा अवलिया म्हणजे प्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे.
राजू आवळे गेल्या 42 वर्षांपासून कुस्ती स्पर्धांमध्ये हलगी वाजवतात. तब्बल चार हजारांपेक्षा जास्त कुस्ती आखाड्यांमध्ये त्यांनी हलगी वाजवली आहे. यामध्ये 10 महाराष्ट्र केसरी स्पर्धा आणि 11कर्नाटक केसरी स्पर्धांचा समावेश आहे.
कुरुंदवाड, जि. कोल्हापूर येथील राजू आवळे यांच्या अनेक पिढ्यांनी हलगी वादन केले आहे. हाच वारसा आणि वादनाचे तंत्र पाझरत राजू आवळेंच्या रक्तात उतरले आहे.
विशेष म्हणजे राजू आवळे यांनी पाच वर्ष नगरसेवक म्हणूनही काम पाहिले आहे. परंतु हलगीलाच त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं आहे. हिंदकेसरी पैलवान मारूती माने यांनी आपल्या पाठीवर टाकलेली कौतुकाची कौतुकाची थाप हा आयुष्यातील सर्वोच्च क्षण असल्याचे राजू आवळे सांगतात. लाल माती आणि बजरंगबलीची कृपा तसेच लोकांचे आशिर्वाद हेच आपल्या ऊर्जेचं रहस्य आहे असंही ते सांगतात. आपल्या हलगीवादनानं कुस्ती आखाड्यातील उत्साह द्विगुणीत करणाऱ्या राजू आवळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी सुरज सकुंडे यांनी केलेली खास बातचीत...

Videos similaires